काशी विश्वेश्वर आश्रमात काशी गिरी महाराज पुण्यतिथी सोहळा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): मुर्डेश्वर पिठाधीश प. पु. श्री ब्रह्मलीन बालयोगी काशी गिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संगीतमय गाथा भजनात्मक पारायण व पंचायत समिती सभापती अनिता सुरेश बनकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला सिल्लोड तालुक्यासहित पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. या पुण्यतिथी सोहळ्याला महंत गणेशानंद सरस्वती महाराज (१००८) तापोनिधी पंचायती आनंदी आखाडा, नामदेव महाराज वाकी, जगन्नाथ गिरी महाराज औंढा नागनाथ, सहजानंद गिरी महाराज त्र्यंबकेश्वर, गौरीशंकर महाराज माजलगाव, अखंड हरिनाम सप्ताह कृष्णागिरी जी महाराज आमसरी, निळकंठ गिरीजी महाराज सारोळा कन्नड, गणेशपुरी महाराज मंगळवेढा जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती अनिता ज्ञानेश्वर मोठे यांच्यावतीने ह. भ. प श्रीकृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.

आश्रमाचे पिठाधीश स्वामी सर्वानंद सरस्वती महाराज, महादेव महाराज, कार्यक्रमाला उपस्थित भाजपा सिल्लोड सोयगाव विधानसभा नेते सुरेश बनकर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोठे, माजी सभापती अशोक गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप दाणेकर, सचिन चौधरी, गजानन राऊत जि प सदस्य राधाकृष्ण काकडे, सचिन वाघ, अनिल खरात, अंकुश कोठाळे नारायण खोमणे, विजय वानखेडे, राजेंद्र दांडगे, नगरसेवक स्वप्निल शिनगारे, योगेश खोमणे, सारंग जैवळ, ज्ञानेश्वर काकडे, विठ्ठल क्षीरसागर, सुभाष बमनावत योगेश साळवे, नारायण उटाडे, आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.